मातृभाषेवर खूप प्रेम करावे.
डॉ.बी.बी.पुजारी
प्राध्यापक
केंद्रीय विश्व विद्यालय कलबुर्गी
मलिकजान शेख लिखित चिलीपिली काव्यासंग्रहाचे प्रकाशन
अक्कलकोट:- मातृभाषेच्या वृद्धीसाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करावे. आपण सीमावर्ती भागात राहत असल्याने भाषा बांधीलकी जपणे खुप महत्वाचे असून आपली साहित्य, संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक वाचन खूप महत्वाचा आहे. आपण आपल्या मुलांना पुस्तके वाचायला दिले पाहिजेत असे प्रतिपादन कलबुर्गी केंद्रीय विश्वविध्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी. बी.पुजारी यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट येथे नुकतेच संपन्न झालेले दुसऱ्या महाराष्ट्र राज्य कन्नड साहित्य संमेलनात आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष युवासाहित्यिक मलिकजान शेख यांचे पहिल्यावहिल्या ‘चिलीपिली’ या बालकाव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. बी. बी.पुजारी म्हणाले की, युवासाहित्यिक मलिकजान शेख आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र राज्य संघटनेचे माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावर समाजोपयोगी कामे केले असून, आज आपल्या समोर बालसाहित्यिक पुढे येत आहे. पुढे जाऊन एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणून ओळखला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन वेळी व्यासपीठावर बसवलिंग स्वामीजी, डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, अमृतानंद महास्वामीजी, डॉ.अभिनव शिवलिंग महास्वामीजी, पूज्य डॉ. शांतालिंग महास्वामीजी, पूज्य पांडुरंग महाराज, वे.बसवराज शास्त्री आमदार सचिन कल्याणशेट्टी, सर्वाध्य्क्षा डॉ. मधुमाल लिगाडे, डॉ.आर. के. पाटील, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, लेखक मलिकजान शेख, महेश हिंडोळे, आनंद तानवडे, गटशिक्षणाधिकारी खुदुसिया शेख, राजशेखर उमराणीकर, दयानंद बिडवे, राजशेखर मसुती, गिरीश जकापुरे, शरणप्पा फुलारी, गुरुबसू वग्गोली, महेश मेत्री, कलमेश अडळट्टी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
चौकट :
युवासाहित्यिक मलिकजान शेख यांनी लिहिलेले ‘चिलीपिली’ बालकाव्य संग्रह खूप छान आहेत. प्रत्येक कविता मुलांचा मनावर प्रभाव टाकणारी आहे. मुलांची आवती-भोवती परिसरातील विषयावर आधारित असल्याने मुलं या पुस्तकाकडे आकर्षित होतात. सर्व शिक्षक आणि पालक ही काव्यसंग्रह पुस्तक आपल्या मुलांना द्यावेत. तसेच मलिकजान शेख यांच्याकडून आणखीन पुस्तक प्रकाशन व्हावे.
-डॉ. मधुमाल लिगाडे
सम्मेलनाचे सर्वाध्यक्षा
चौकट :
आज आपण जे काही आहे ते आपल्या मातृभाषामुळे. आपल्या मातृभाषेवर अभिमान व स्वाभिमान असला पाहिजे. तेव्हा मात्र आपल्या प्रादेशिक भाषा टिकून राहतील. युवासाहित्यिक मलिकजान शेख यांचे ‘चिलीपिली’ बालकाव्यसंग्रह शिक्षक आणि मुलाना खूप उपयोग होईल. त्यांना खूप-खूप शुभेच्छा.
-सोमशेखर जमशेट्टी
अध्यक्ष, कन्नड साहित्य परिषद, महाराष्ट्र


